Monday 14 September 2015

Manache Pach {Five} Ganpati of Pune - Read Story in Marathi {Ganesha 2015}

दि. 17 सप्टेंबर 2015 रोजी 'गणेश चतुर्थी' आहे. या दिवसापासून दहा दिवस चालणा-या गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रथम पुजनिय गणरायाला मंगलमुर्ती, दुःखहर्ता, लंबोधर, गणनायक अशा नानाविध नावांनी संबोधले जाते. श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो.आणि त्‍यांचे भक्‍तही मोठ्या पुज्‍यभावाने त्‍याची पूजा करतात. सार्वजनिक गणेशउत्‍सवाची सुरुवात पुण्‍यातून झाली. लोकमान्‍य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्‍सवा प्रारंभ केला. अन् तेव्‍हापासून पुण्‍यामध्‍ये सार्वजनिक गणेशोउत्‍सव मोठ्या थाटा-माटात अन् उत्‍साहात साजरा केला जातो.राज्‍यात, देशातीलच नव्‍हे तर परदेशातही पुण्‍यातील गणेशोत्‍सावाचे आ‍कर्षण आहे. देशाच्‍या कानाकोप-यातून लोक, भाविक गणेश उत्‍सवाला पुण्‍यात येतात.
 
पुणे म्‍हणजे महाराष्‍ट्राची सांस्‍कृतिक, शैक्षणिक राजधानी आहे. पुण्‍यामध्‍ये सर्वांत लोकप्रिय आहे तो 'गणेशोत्‍सव'. ढोल ताशांच्‍या गजरात अन् "गणपती बाप्पा मोरया'च्या जल्लोषात विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत करण्‍यात येते. गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. पारंपरिक वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत.
 
Ganpati Song - Ashtavinayak Tuza Mahima Lyrics {MP3 Download}
http://mruvie.blogspot.in/2015/09/ganpati-song-lyrics-in-marathi-mp3.html
 

श्री कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत )

 
पुण्याचे ग्रामदैवत म्‍हणून श्री कसबा गणपती ओळखले जाते. या गणरायाची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. अशी आख्‍यायिका या गणपतीविषयी सांगण्‍यात येते. गणेशोत्सवात श्री कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.
 

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

 
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. मानाचा दुसरा गणपती म्‍हणून या गणपतीला ओळखले जाते. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये असते.
 

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती

 
मानाचा तिसरा गणपती म्‍हणून गुरुजी तालीम मंडळाच्‍या गणपतीचा उल्‍लेख होतो. सुरुवातील हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नसली तरी या गणपतीला गुरुजी तालीम मंडळाचा गणपती असे नाव पडले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा या मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते.
 

श्री तुळशीबाग गणपती

 
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या श्रींची मूर्ती फायबरची आहे. दरवर्षी विविध संकल्‍पना घेवून येथे देखावे तयार केले जातात. त्‍यामाध्‍यमातून समाजाला एक विशेष संदेश देण्‍यात येतो.
 

केसरी गणपती

केसरी संस्थेचा गणपती 1894 पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत.
 
Unique Ganpati Home Decoration Ideas - Eco-Friendly Tips 2015
http://mruvie.blogspot.in/2015/09/unique-ganpati-home-decoration-ideas.html
 
Incoming Search Terms:
  • manache 5 ganpati pune
  • pune manache ganpati names
  • pune manache ganpati list
  • manache ganpati pune 2015
  • manache 5 ganpati pune
  • first five manache ganpati pune
  • pune manache ganpati 2015

0 comments:

Post a Comment

Thanks for you comment! I appreciate you. Get subscribe for more updates.